2022 अर्ज भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% शेतकरी अनुदान योजना

Contents hide

महाडीबीटी शेतकरी योजना 2022 अर्ज 

मित्रांनो जर तुम्ही आजपर्यंत महाडीबीटी वरील कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नसेल, आणि तुम्हला त्या योजनांचा लाभ घेयचा असेल,तर त्याचे रजिस्ट्रेशन कसे करायचे, शेतीची अवजारे, ट्रॅक्टर ,कृषी सिंचन यांसाठी अर्ज कसा करायचा या प्रश्नाच्या उत्तरे आम्ही आज तुम्हला देणार आहोत. त्यासाठी लवकरच रेजिस्ट्रेशन करून महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घ्या . रजिस्ट्रेशन पासून ते अर्ज भरून पेमेंट पर्यंतची सर्व माहिती पाहण्यासाठी खालील विडिओ नक्की पहा. आणि अर्ज करून योजनांचा लाभ नक्की घ्या. 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2022

महाराष्ट्रात सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य टप्प्याटप्प्याने दिले जाते. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडीकरता दोन हेक्‍टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे, ते भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत. महाराष्ट्रात ८० टक्के अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत.  त्यांना जॉब कार्ड नसल्यामुळे ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाहीत. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.  तसेच या योजनेच्या माध्यमातून पशुधन व पीक याबरोबरच फळबाग शेतीला हि प्रोत्साहन मिळणार आहे. 

हाडीबीटी लॉटरी मध्ये नाव आहे का नाही कसे पाहायचे?

जर तुम्ही २०२०-२१ साठी महाडीबीटीवर अर्ज केलेला होता, लॉटरीत नाव आले का नाही, पूर्वसंमती मिळाली का नाही ते कसे बघायचे, ते असे पाहायचे आणि कागदपत्रे कधी अपलोड करायची अशे प्रश्न तुम्हला नक्कीच पडले असतील, त्यासाठी खालील विडिओ पहा.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०१८-१९ पासून सुरु करण्यात अली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही, त्यांना लाभ देण्यात येणार आहे.

  • या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% असणे गरजेचे आहे. हे प्रमाण जर कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे गरजेचे आहे. अश्याप्रकारे शेतकऱ्याला १००% अनुदान ३ वर्ष्यात फळबाग लागवडीवर मिळणार आहे .
  • अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले गेलेलेआहे.
  • या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेण्यासाठी शेतकरी कोंकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीच जास्त १० हे. तर इतर विभागात कमीत कमी २० गुंठे तर जास्तीच जास्त ६ हे. क्षेत्र मर्यादेत लाभ घेऊ शकतो.

नाव लॉटरीत आले आहे, कागदपत्रे  कशी अपलोड करायची?

मित्रांनो, जर तुम्ही महाडीबीटीवर शेतकरी योजनांसाठी अर्ज केलेला असेल, त्यामुळे तुमचे नाव जर सोडतीमध्ये आले असेल आणि तुम्हला ,महाडीबीटी कडून मॅसेज आला असेल, तर तुम्ही लवकरात लवकर तुमची कागदपत्रे अपलोड करा. कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाडीबीटी पोर्टल ३१ मार्च २०२१ पर्यंत बंद राहील अशी सूचना आली आहे . कागदपत्रे कशी अपलोड करायची ते पाहण्यासाठी खालील विडिओ पहा.

 १ कोटी २० लाख भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०२१ निधी मंजुरी १७ फेब्रुवारी, २०२१ latest gr

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या नवीन आर्थिक वर्ष्याच्या अंमलबजावणीसाठी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी रुपये ६ कोटी अर्थसंकल्पिय निधीची तरतूद करण्यात आली होती. त्याच अर्थसंकल्पीय तरतुदीच्या २०% म्हणजेच १ कोटी २० लाख एवढा निधी वितरित करण्यास मंजुरी १७ फेब्रुवारी , २०२१ रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आली. सदर निधी शासन निर्णयान्वये कृषी विभाग कृषी आयुक्तालय यांना वितरित करण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे. तो शासन निर्णय सविस्तरपाणे पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना  gr –

राज्यात हि योजना २०२०-२१ मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ४०% च्या मर्यादेत खर्च करण्यास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता २२ जानेवारी २०२१ रोजी मंजूर झालेल्या gr मध्ये देण्यात अली आहे.

सदर मंजूर शासन निर्णयामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु. १००००.०० लाख मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ४० टक्के च्या मर्यादित म्हणजेच रु. ४०००. ०० लाख एवढ्या रकमेस प्रशासनाकडून मान्यता दिली आहे. एकूण ४००००. ०० लाख निधीपैकी रु. २०००. ०० लाख निधी यापूर्वीच कृषी आयुक्त कार्यालयास वितरित करण्यात आला आहे. आणि उर्वरित रुपये. २०००. ०० लाख निधी कृषी आयुक्त यांना अर्थसंकल्प वितरित करण्याचा नवीन शासन निर्णय २२ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आला. सदर मंजूर शासन निर्णय पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान वैयक्तिक शेततळे अनुदान योजना 2021-22

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता व कागदपत्रे  :

  • लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.
  • सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व अज्ञात मुले)
  • लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे. संस्थात्मक लाभार्थांना लय योजनेचा लाभ देय नाही.
  • शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर ७/१२ असणे गरजेचे आहे. संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
  • ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे.
  • परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.
greps farming image, drakshye bag

महाडीबीटीवरील सर्व योजनांची संपूर्ण माहिती

महाडीबीटी अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या सविस्तर माहितीसाठी म्हणजेच अटी,पात्रता ,कागदपत्रे , अनुदान कोणत्या घटकासाठी किती असणार , यांची माहिती तुम्ही खालील योजनांच्या लिंक वर जाऊ शकता आणि पात्र असणाऱ्या संबंधित योजनांची संपूर्ण माहिती घेऊ शकता .

१० कोटी फळपीक विमा योजना सन २०२१-२२ साठीआंबिया बहराकरिता निधी वितरीत

अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या . अधिक माहितीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा. आणि अश्याच नवनवीन योजनांची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा.

Recent Posts

Leave a Comment

Translate »