हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण मिरची या पिकाचे नियोजन कसे करायचे, याची सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये मिरची साठी आवश्यक अनुकूल असणारे हवामान कोणते असणार आहे, जमीन कोणती असणार आहे, कोणत्या हंगामात मिरचीची लागवड करणे अति उत्तम असणार आहे, तसेच मिरचीच्या जाती यांची माहिती पाहणार आहोत. तसेच किती एकरामध्ये किती बियाण्याची लागवड ही करायला पाहिजे म्हणजे उत्पादन हे अधिक दर्जेदार येईल. तसेच जमिनीची पूर्वमशागत, मिरचीची लागवड कशी करायची, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मिरचीची अंतरमशागत, प्रति हेक्टरी उत्पादन किती मिळते, . या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखात पहाणार आहोत. जर तुम्ही या पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात मिरचीचे लागवड करण्याचे नियोजन करत असाल, तर त्यासाठी हा लेख खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

मिरची या पिकाची मागणी ही वर्षभर चालूच असते. याकरीता भारतीय मिरचीला परदेशातूनही चांगली मागणी आहे. भारतात मिरची लागवड ही अंदाजे एक लाख हेक्‍टर शेती क्षेत्रावर केली जाते. तसेच मिरचीमध्ये जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीला संतुलित आहार मध्ये समावेश केला जातो. तिखटपणा आणि स्वाद यामुळे मिरची महत्त्वाचे मसाल्याचे पीक असे समजले जाते.

mirchi lagavd mahiti
Contents hide

मिरचीसाठी अनुकूल हवामान कोणते ?

मिरची साठी उष्ण किंवा दमट हवामानात अनुकूल असते. अश्या हवामानात मिरचीचे पीक अधिक चांगल्या प्रकारे येते. मिरचीची लागवड ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये करता येते. पावसाळ्यात जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने फुलांची गळ जास्त प्रमाणात होते. त्यामुळे पाने व फळे कुजण्याची शक्यता असते. मिरचीची वाढ २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला चांगली होते आणि उत्पादन ही भरपूर प्रमाणात निघते. मिरची पिकाच्या बियाण्यांची उगवण ही १८ ते २७ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये उत्तम प्रकारे होते.

            कांदा फवारणी आणि खत व्यवस्थापन वेळापत्रक, पहा कांद्याचे व्यवस्थापन कसे करायचे.

मिरची पिकासाठी जमीन कोणती निवडावी?

पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम जमीन मिरची पिकाच्या लागवडीस ही अतिउत्तम असणार आहे. तसेच हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरल्यास अती जमीन मिरचीच्या पिकास योग्य ठरू शकते. पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नसेल, तर त्या जमिनीत मिरचीचे पीक अजिबात घेऊ नये. मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन ही शेतकऱ्याने निवडावी. कारण त्या जमिनीत पीक उत्पादन अधिक चांगले होऊ शकते. जर तुम्ही उन्हाळ्यात या पिकाची लागवड करण्याचे विचार करत आहात, तर मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. तसेच जर तुमच्याकडे चुनखडी असलेली जमीन असेल, तर त्यामध्ये ही मिरचीचे पीक खूप चांगल्या प्रकारे येते.

मिरची पिकाची लागवड कधी करायची ?

 • खरीप मिरची पिकाची लागवड जून, जूलै महिन्‍यात करावी.
 • उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी, फेब्रूवारी महिन्‍यात करावी.
mirchi jati

 

मिरचीच्या जाती आणि त्यानुसार त्यांची वैशिष्ट्ये –

पुसा सदाबहार –

 • पिकलेली मिरची तेजस्वी लाल रंगाची असते.
 • या जातीची पाने इतर जातींपेक्षा रुंद असतात आणि झाडे उंच असतात.
 • या जातीच्या हिरव्या मिरचीच्या सरासरी उत्पन्न हे साडेसात ते दहा टन व वाळलेल्या मिरचीचे उत्पन्न दीड ते दोन टन शेतकऱ्याला मिळू शकते.
 • ही जात मावा, कोळी या किडींना तसेच डायबॅक आणि विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक आहे.

संकेश्वरी -३२ –

 • या जातीची झाडे ही उंच असतात.
 • वाळलेल्या मिरचीचा रंग हा गडद लाल असतो.
 • या जातीच्या मिरचीच्या साल पातळ असते आणि ती २० ते २५ सेंटीमीटर पर्यंत लांब असते व त्यावर सुरकुत्या असतात.

पुसा ज्वाला –

 • या जातीची मिरची वजनदार आणि खूप तिखट असतात.
 • पिकलेली लाल मिरची ही खूप तिखट असते आणि ती मसाल्यासाठी वापरली जाते.

मुसळवाडी –

 • या जातीची झाडे उंच असतात
 • खरीप हंगामासाठी ही जात चांगली आहे.
 • या जातीच्या मिरची बोकड्या आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.

पंत सी-१ –

 • पंत सी वन या जातीच्या मिरच्यांचे उत्पादन हे दोन्ही साठी चांगले होते. म्हणजेच हिरव्या व वाळलेल्या मिरच्या यांसाठी या जातीचे उत्पादन हे खूप चांगले मिळते.
 • या जातीची फळे उलटी असतात.
 • फळे आठ ते दहा सेंटिमीटर लांब असून याची साल जाड असते.
 • या मिरचीतील बियांचे प्रमाण हे खूप अधिक प्रमाणात असते.
 • या जातीच्या मिरच्या ह्या बोकड्या रोगास प्रतिकारक आहेत.
 • या प्रकारच्या मिरच्या पिकल्यानंतर खूप आकर्षक म्हणजेच खूप लाल रंगाच्या दिसतात.

                        सोयाबीन लागवड आणि खत व्यवस्थापन कसे करावे.

लागवडीसाठी प्रति एकरी किती बियाण्यांचे प्रमाण किती वापरावे ?

मिरची लागवड करताना दर हेक्टरी एक ते दीड किलो बियाणे वापरावे.

 

मिरची लागवडीसाठी पूर्व मशागत कशी करायची?

मिरची लागवडीच्या आधी एप्रिल-मे महिन्यात जमीन पुरेशी नांगरून तयार करावी आणि त्या जमिनीतहेक्टरी नऊ ते दहा टन कुजलेले शेणखत मिसळावे.

जमिनीची पूर्वमशागत झाल्यानंतर लागवड कशी करायची?

 • जिरायती पिकासाठी वाफ्यावर रोपे तयार करतात, तर बागायती पिकासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार केली जातात.
 • गादीवाफे तयार करण्यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत केली जाते.
 • जमिनीत दर हेक्‍टरी १५-२० टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
 • त्यानंतर २५ फूट लांब चार फूट रुंद दहा सेंटिमीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत.
 • प्रत्येक गादी वाफ्यावर ३० किलो चांगले कुजलेले शेणखत आणि अर्धा किलो सुफला मिसळावे.
 • बी पेरणीसाठी आठ ते दहा सेंटिमीटर अंतरावर रुंदीला समांतर ओळी तयार करून घ्याव्यात.
 • त्यामध्ये दहा टक्के फोरेट दाणेदार १५ ग्रॅम टाकून मातीने झाकून घ्यावे.
 • त्यानंतर या ओळी मध्ये दोन सेंटीमीटर ओळीवर पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे.
 • बियाणांची उगवण होईपर्यंत दररोज पाणी द्यावे .
 • त्यानंतर ३० ते ४० दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतील.
 • उंच व पसरट मिरचीचं जातींची लागवड ही १६*१६ सेंटीमीटर एवढ्या अंतरावर आणि जी मिरचीच्या बुटक्या जातींची रोपांची लागवड ६०*४५ अशा अंतरावर करावी.
 • मिरचीची लागवड ही ४५*४५ अंतरावर करावी.
 • रोपांची सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी .
 • रोपे गादीवाफयातून काढल्यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे दहा लिटर पाण्यात १५ मिली मोनोक्रोफॉस ३६ टक्के प्रवाही , २५ ग्रॅम डायथेन एम-४५ आणि ३० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक ८०% मिसळलेल्या द्रावणात बुडवून लावावीत.

 

                                            द्राक्ष एप्रिल छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक

मिरची पिकाचे खत आणि पाणी व्यवस्थापन कसे करायचे ?

मिरची पिकाचे खत व्यवस्थापन –

 • मिरची पिकाच्या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्‍टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद हे जमिनीत घालावे.
 • ओलिताच्या मिरची पिकासाठी दर हेक्‍टरी ५० किलो पालाश, ५० किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद हे जमिनीला द्यावे.
 • यापैकी स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीच्यावेळी जमिनीला द्यावी. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा शिल्लक राहते ती मात्रा रोपांच्या लागवडीनंतर ३० दिवसांनी मिरची पिकास मिरची पिकाला बांगडी पद्धतीने द्यावी.
 • मिरचीला वेळेवर कोळपणी व खते दिल्याने रोपांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होते.

मिरची पिकाचे पाणी व्यवस्थापन –

 • जर बागायती मिरची असेल, तर लागवडीच्या जमिनीप्रमाणे मिरची पिकाला पाणी द्यावे.
 • मिरची पिकाला प्रमाणापेक्षा जास्त ही पाणी देऊ नये आणि कमी पाणी देऊ नये
 • मिरचीची झाडे फुलावर आणि फळावर आले असताना, झाडांना पाण्याचा ताण द्यावा.
 • रोपे लावणीनंतर दहा दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात एक दिवसाआड हे रोपांना पाणी द्यावे.
 • त्यानंतर एक आठवड्यात किंवा पाच दिवसांच्या अंतरानं मिरची पिकाला पाणी द्यावे.
 • जर तुम्ही मिरची मिरची लागवड हिवाळ्यात करत असाल, तर हिवाळ्यात १०-१५ दिवसांच्या अंतराने मिरची पिकाला पाणी द्यावे.
 • जर तुम्ही लागवड उन्हाळ्यात करत असाल, तर सहा ते सात दिवसांच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे.

प्रति हेक्टर मिरचीचे उत्पादन किती निघते ?

 • बागायती हिरव्‍या मिरच्‍यांचे उत्पादन हेक्‍टरी ८०-१०० क्विंटल मिळते. तर कोरडवाहू मिरचीचे उत्‍पादन ६ ते ७ क्विंटल येते.
 • वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन ९-१० क्विंटल निघते.

मिरचीच्या पिकाची अंतर मशागत कशी करावी?

 • २०-२५ दिवसांनंतर पहिली खुरपणी करावी.
 • शेत तण विरहित ठेवण्याचा प्रयत्न करावा.
 • लागवडीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी खरीप मिरचीला मिरचीचा रोपांना भर द्यावी.

मिरची पिकाची तोडणी कधी करायची?

 • लागवडीनंतर साधारण अडीच महिन्यांनी मिरचीची पहिली तोडणी सुरू करावी.
 • झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर दहा दिवसांच्या अंतराने मिरचीची तोडणी करावी.
 • साधारणपणे तोडणी सुरु झाल्यानंतर तीन महिने तोडे सुरू राहतात. अशा प्रकारे या तीन महिन्यांमध्ये आठ ते दहा मिरचीचे तोडे हे सहज होतात.
 • वाळलेल्या मिरची साठी त्या पूर्ण झाडावर पिकून गेल्यानंतर त्यांची तोडणी सुरु करावी.

                                        कोबी खत आणि फवारणी व्यवस्थापन वेळापत्रक

Recent Posts

Leave a Comment

Your email address will not be published.