Free Silai Machine Yojana Maharashtra 2022: नमस्कार मित्रांनो आज आपण PM फ्री शिलाई मशीन योजना २०२२ महाराष्ट्र संबंधित संपूर्ण मराठी माहिती आज या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे, या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, या योजनेसंबंधी चा ऑनलाईन फॉर्म, ऑनलाइन एप्लीकेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्जाची प्रक्रिया, टोल फ्री नंबर इत्यादी सर्व गोष्टींची माहिती आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Free Silai Machine Yojana Maharashtra Highlights
योजनेचे नाव | फ्री शिलाई मशीन योजना |
आरंभ केला | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी |
वर्ष | २०२२ |
लाभार्थी | ग्रामीण भागातील महिला |
उद्दिष्ट | आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवणे आणि उत्पन्नाच्या संधी उपलबद्ध करून देणे |
श्रेणी | केंद्र सरकारच्या योजना |
अधिकृत संकेतस्थळ | www.india.gov.in |
Free Silai Machine Yojana Maharashtra 2022
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ आपल्या देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मिळणार आहे. प्रधानमंत्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये ५० हजाराहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशिन उपलब्ध करून दिली जाणार आहे. ज्यामुळे महिला घरी बसून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. या योजनेअंतर्गत २० ते ४० वयोगटातील महिला अर्ज करू शकतात आणि या योजनेअंतर्गत फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकतात.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना रोजगार देण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना २०२२ मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि कष्टकरू महिलांना केंद्र शासनाकडून मोफत शिलाई मशीन देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला घरी बसून स्वतःचा रोजगार सुरू करू शकतील आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकतील.
Free Silai Machine Yojana Maharashtra 2022 उद्दिष्ट काय?
फ्री सिलाई मशीन योजना २०२२मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे. जेणेकरून देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना मोफत शिलाई मशिन उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे देशातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत होतील आणि त्या घरबसल्या शिवणकाम करून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आर्थिक भार पेलू शकतील. या योजनेच्या माध्यमातून शिवणकाम येत असलेल्या कामगार महिला स्वावलंबी आणि सक्षम बनतील. तसेच त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ देशातील बऱ्यापैकी राज्यांमधील स्त्रिया घेऊ शकतील.
पीएम वाणी योजना २०२२ रजिस्ट्रेशन: फ्री वाय फाय स्कीम
मोफत शिलाई मशीन २०२२ साठी आवश्यक पात्रता काय?
- या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय २० ते ४० वर्षे असावे.
- अर्जदार महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न (तहसीलदार उत्पन्न दाखल्यानुसार) १२,०००/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- देशातील विधवा आणि अपंग महिला देखील या योजनेचा लाभ घेऊन स्वावलंबी आणि सक्षम बनवू शकतात.
मोफत शिलाई मशीन योजनेमध्ये कोणती राज्ये समाविष्ट आहेत?
ही योजना केवळ काही राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे, काही काळानंतर ही योजना संपूर्ण देशात लागू केली जाईल. ही योजना लागू झालेल्या राज्ये यादी खालीलप्रमाणे आहेत-
- हरियाणा
- गुजरात
- महाराष्ट्र
- उत्तर प्रदेश
- कर्नाटक
- राजस्थान
- मध्य प्रदेश
- छत्तीसगड
- बिहार
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
- आधार कार्ड
- वय प्रमाणपत्र.
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- ओळखपत्र.
- अपंग असल्यास अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र .
- महिला विधवा असल्यास तिचे निरीक्षक विधवा प्रमाणपत्र.
- समुदाय प्रमाणपत्र.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- मोबाईल नंबर.
मोफत शिलाई मशीन योजना फॉर्म २०२२ अर्ज कसा करावा?
- या योजनेंतर्गत, इच्छुक महिलांना अर्ज करायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल .
- यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल.
- वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला अर्ज मिळवावा लागेल .
- अर्ज मिळवल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, आधार कार्ड इत्यादी भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जासोबत एक फोटो जोडावा लागेल.
- या योजनेसाठी चा फॉर्म हा तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये जसे की ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय किंवा जिल्हा कार्यालय अशा सरकारी कार्यालयांमध्ये तुम्ही हा फॉर्म जमा करू शकता.
- त्यानंतर, कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल. पडताळणी झाल्यानंतर, तुम्हाला मोफत शिवण मशीन दिली जाईल.
योजनेच्या अधिक माहिती साठी पत्ता –
- टेक्निकल टीम
- नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर
- A4B4, तिसरा मजला, A ब्लॉक
- CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड
- नवी दिल्ली-110003
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023
- Krushi Seva Kendra Licence Maharashtra Application संपूर्ण माहिती
- E Shram Card Ka Paisa Kaise Check Kare ? जानिए स्टेप बाइ स्टेप
- ३९ कोटी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना निधी वितरित
- शासन आपल्या दारी योजना 2023 संपूर्ण माहिती । Shasan Aplya Dari Yojana Registration