Kharip Pik Vima Anudan Yojana PMFBY 2024 Online Apply: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये खरीप पिक विमा योजना 2024 (Pradhan Mantri Pik Vima Yojana 2024) संबंधित शासन निर्णयाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्या मध्ये काय आहे पीक विमा अनुदान योजना 2024 उद्दिष्ट्य, प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना 2024 प्रमुख वैशिष्ट्ये कोणती, खरीप पीक विमा नुकसान भरपाई अनुदान योजना 2024 मध्ये येणारे शेतकरी आणि पिके कोणती, विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान किती, पिक विमा नुकसान भरपाई निकष, pmfby application form pdf in marathi, पिक विमा योजना खरीप हंगामासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, pik vima online apply registration, खरीप पीक विमा GR इत्यादी सर्व माहिती आज या लेखात पाहणार आहोत.
प्रधानमंत्री पीक योजना खरीप हंगाम 2024
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना खरीप हंगाम 2020 पासून तीन वर्षासाठी राबवण्यास मान्यता देण्यात आलेली होती. तथापि, केंद्र शासनाने योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिलेली आहे. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 व रब्बी 2022 -23 हंगामासाठी एक वर्षाकरिता राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचारधिन होती. त्या अनुषंगाने शासनाने 1 जुलै 2024 रोजी पासून पिक विमा योजना अर्ज सुरू केलेले आहेत.
खरीप पिक विमा योजनेची उद्दिष्ट
- नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे,
- पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
- शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
- कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे जेणेकरून उत्पादनातील जखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नधान्य पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.
PMFBY 2022-खरीप आणि रब्बी हंगाम पीक विमा 2020-21 पासून 3 वर्ष्यांसाठी माहिती
प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
- ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रासाठी केवळ अधिसूचित पिकांसाठीच असेल प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असणार आहे.
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेत करणारे शेतकरी या योजनेस पात्र असतील.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा भीमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
- या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 व रब्बी हंगाम 2024 या एका वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आलेला आहे.
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील सात वर्षापैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या पाच वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल.
- उंबरठा उत्पादन हे एक वर्ष कालावधी करिता असेल. तसेच विमा कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दरही या एक वर्ष कालावधी करिता असेल.
- ही योजना एकूण १२ जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्या मार्फत एका वर्षाकरिता राबवण्यात येईल.
- विमा कंपन्या एका वर्षामध्ये जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या 110% पर्यंत चे दायित्व स्वीकारतील. तथापि एका वर्षातील देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमा विमा हप्ता रकमेच्या 110% पेक्षा जास्त असल्यास 110% जास्तीचा भार राज्य शासन स्वीकारेल. आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेंपेक्षा कमी असेल. तर विमा कंपनी विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त २०% रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला परत करेल.
योजनेअंतर्गत जोखमीच्या बाबी
खरीप व रब्बी हंगामा करिता
- हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किमान लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान
- पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान
- पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, भूत्खलन, पूर, क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ, कीड व रोग, पावसातील खंड इत्यादी बाबी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट
- नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकाचे नुकसान
- नैसर्गिक कारणामुळे होणारे पिकांचे काढणी पश्चात नुकसान
पीक विमा योजनेत समाविष्ट असणारी पिके आणि शेतकरी
या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. ही योजना राज्यात शासनाने खरीप आणि रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळ/मंडळ गट/ तालुकास्तरावर खालील अधिसूचित पिकांसाठी राबवण्यात येईल.
पीक वर्गवारी | खरीप हंगाम | रब्बी हंगाम |
तृणधान्य व कडधान्य पिके | भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका | गहू (बागायत), रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात |
गळित धान्य पिके | भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन | उन्हाळी भुईमूग |
नगदी पिके | कापूस, खरीप कांदा | रब्बी कांदा |
राज्यात अधिसूचित क्षेत्रासाठी खरीप हंगामातील भात व उन्हाळी भात पीक अधिसूचित करण्यात आलेले आहे.. यासाठी उंबरठा उत्पादन व चालू वर्षाचे सरासरी उत्पादन हे तांदूळ गृहीत धरू निश्चित केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा रब्बी हंगाम साठी ११७ कोटी २६ लाख रक्कम वितरित
पीक विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान किती?
या योजनेअंतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारण्यात येईल. तथापि सर्व शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामासाठी भरावयाचा प्रती हेक्टर विमा हप्ता दर खालील प्रमाणे असेल.
या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला पीकनिहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा हप्ता दर यामधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजण्यात येईल. विमा हप्ता अनुदानाच्या केंद्र हीस्याला नवीन सुधारणा नुसार मर्यादा आल्या आहेत. योजनेच्या केंद्र शासनाच्या प्रचलित मार्गदर्शक सूचनेनुसार निवेदन द्वारे प्राप्त मिळून विमा हप्ता दरातील शेतकरी हिस्सा वजा जाता उर्वरित रक्कम ही राज्य व केंद्र शासनामार्फत समप्रमाणात विमा कंपनीस दिली जात होती. तथापि केंद्र शासनाच्या दिनांक 17 ऑगस्ट 2020 रोजीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार विमा हप्ता अनुदानाच्या केंद्रशाला मर्यादा लागू राहतील. केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासन कोरडवाहू जिल्ह्यातील पिकांना 30 टक्के व बागायती जिल्ह्यातील पिकांना २५ टक्के मर्यादित त्याच्या समप्रमाणातील हिस्सा देणार आहे.
खरीप पिक विमा योजना 2024 विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता
प्रधानमंत्री पिक विमा योजना 2024-25 अंतर्गत राज्यात सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पीक कर्ज दर समितीने निश्चित केलेली पीक कर्जदराप्रमाणे पिक विमा संरक्षण रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पीकनिहाय पीक कर्जामध्ये तफावत असून राज्य पीक कर्ज दर समितीच्या दरापेक्षा काही जिल्ह्यांमध्ये जास्त दराने पीक कर्ज दरास मान्यता देण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यात राज्य पीक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या कमाल कर्जदरापेक्षा जास्त दर निश्चित केला आहे. त्या जिल्ह्याचे विमा संरक्षित रक्कम ही राज्य पीक कर्जदार समितीने त्या पिकासाठी निश्चित केलेली मर्यादा राहील.
फळपीक विमा योजना माहिती २०२०-२१ पासून पुढील ३ वर्ष्यासाठी
पिक विमा नुकसान भरपाई निकष
- जर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा कमी असेल, तर हे विमा क्षेत्र मदतीसाठी पात्र राहील.
- पिक व पिकांच्या गटासाठी अधिसूचित विमा क्षेत्राकरिता या जोखीम निश्चिती करिता आवश्यक तरतुदींचे पूर्तता करून नुकसान भरपाई देणेबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढावी.
- राज्य शासनाचेअधिकारी व पीक विमा कंपनी यांच्या संयुक्त पाहणीनुसार नुकसानीचे प्रमाण व द्यावयाची नुकसान भरपाई निषेध केली जाईल.
- संबंधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जाहीर केल्या जाणाऱ्या नुकसानीच्या अधिसूचने अगोदर ज्या शेतकऱ्यांनी विमा हप्ता रक्कम भरली आहे किंवा त्यांच्या खात्यातून विमा हप्ता रक्कम वजा करून घेण्यात आलेली आहे. असेच शेतकरी सदर मदतीसाठी पात्र राहतील.
- इच्छुक कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत पीक कर्ज मंजुरी नंतर १५ दिवसाच्या आत सर्व कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता कपात केला जाईल.
- तसेच सर्व इच्छुक कर्जदार शेतकऱ्यांना सदरची तरतूद लागू होईल. याची सर्व बँकांनी दक्षता घ्यावी.
- बँकांच्या चुकीमुळे विमा संरक्षणापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चे दायित्व संबंधित बँकेचे असेल.
- अपेक्षित नुकसान भरपाई रकमेच्या पंचवीस टक्के मर्यादेपर्यंत नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. व ही मदत अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल.
- जर प्रतिकूल परिस्थिती ही सर्वसामान्य काढणी वेळेच्या पंधरा दिवस अगोदर आली. तर सदर तरतूद लागू राहणार नाही व नुकसान भरपाई देय होणार नाही. नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अधिसूचित विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरण्यात येईल.
पिक विमा नुकसान भरपाई चे सूत्र
नुकसान भरपाई रक्कम रुपये= (उंबरठा उत्पादन – अपेक्षित उत्पादन)/ उंबरठा उत्पादन× विमा संरक्षण रक्कम× 25%
1 जुलै 2024 पासून राज्यांमध्ये पिक विमा योजना करता 2024 च्या अर्ज सुरु आहेत. पिक विमा भरत असताना दोन पद्धतीने पिक विमा भरता येतो. ज्या शेतकऱ्यांना स्वतः पिक विमा भरता येत नाही, ते शेतकरी सीएससीच्या माध्यमातून शकतात. आणि जे शेतकरी या ठिकाणी स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून शकतात. त्यांना फार्मर लॉगिनच्या माध्यमातून पिक विमा भरता येतो. त्याची लिंक खाली दिलेली आहे.
खरीप पीक विमा योजना Online अर्ज
अशाप्रकारे आम्ही या लेखाच्या माध्यमातून खरीप पिक विमा योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे अद्याप तुम्हाला काही शंका असतील किंवा पीक विमा योजना जीआर ची माहिती हवी असेल तर तुम्ही खालील लिंक वर जाऊ शकता.
- Yamuna Authority Plots: YEIDA Plot Scheme 2024 निवेश का सही समय? ये बातें आपको पता होनी चाहिए
- कृषी उन्नत्ती योजना GR
- YEIDA Plot Scheme 2024 Online Apply: Extended Dates, PDF, आवेदन कैसे करें और जानें सारी जानकारी
- तुमच्या मोबाईलमधून करा तुमचे मतदान (कार्ड) ओळखपत्र आणि आधार लिंक
- दूध उत्पादक शेतकरी GR 2024 | Dudh Utpadak Shetkari Subsidy Scheme GR